मुंबई : शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमचा काहीच संबंध नाही. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी ज्या जमिनी घेतल्या ते प्रकरण बाहेर काढले. त्याचा बदल घेण्यासाठीच आम्हला टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप ऍड. जयश्री पाटील यांनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी कर्मचाऱ्यांना भडकवल्याप्रकरणी न्यायालयाने वकील गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिलीय. त्यानंतर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी पवार कुटुंबियांवर मोठे आरोप केलेत. पवार भ्रष्टाचाराचे कॅन्सर आहेत. शरद पवार, अजित पवार यांची 600 कोटींची केस बाहेर काढली, त्याचा बदला घेण्यासाठी ही अटक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. 


शरद पवार, दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे, अजित पवार हे कायद्याचा अयोग्य वापर करत आहे. आम्हाला टार्गेट करण्यासाठी त्यांना अटक केली आहे. त्यांच्यापासून माझे पती आणि माझ्या कुटुंबियांना धोका आहे, असे त्या म्हणाल्या. 


जे कामगार आझाद मैदान येथे 5 महिन्यापासून होते. हजारोंच्या संख्येने आले होते तेव्हा कोणताही प्रकार घडला नाही. पण, कष्टकरी केस जिंकले त्यानंतर हे प्रकरण घडलं. यामागे काहीतरी कटकारस्थान असल्याचे त्यांनी सांगितले. 


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा १०० कोटींचा घोटाळा बाहेर काढला. आता शरद पवार, अजित पवार यांचा ६०० कोटींचा बाहेर काढला, त्यामुळेच आम्हाला  टार्गेट करण्याचे येत असल्याचा आरोप त्यांनी केला.