मुंबई :  आपापल्या पक्षांच्या आमदारांना घेऊन कॉंग्रेस, भाजप पदाधिकारी विधान भवनात पोहोचत होते. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे नितीन राऊत, अशोक चव्हाण आदी नेते त्याआधीच विधानभवनाकडे रवाना झाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँगेस उमेदवार प्रताप इम्रानगढी यांना कोणताही धोका पोहोचू नये यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले आणि मंत्री बाळासाहेब थोरात हे पोलिंग एजंट झाले. तर, राष्ट्रवादीतर्फे जयंत पाटील, सुनील तटकरे यांनी  पोलिंग एजंटची भूमिका बजावत होते.


या निवडणुकीसाठी प्रथम मतदान करण्याचा निर्णय राष्ट्राची काँग्रेसने घेतला. राष्ट्रवादीच्या २१ आमदारांनी प्रथम मतदान केले. राष्ट्रवादीच्या या आमदारांमध्ये आणि एकूणच राज्यसभेच्या निवडणुकीत प्रथम मतदान करण्याचा मान राष्ट्रवादीचे राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांना मिळाला. 


राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी आमदारांमध्ये प्रथम मतदान केले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अंदमानी मतदानास सुरुवात केली. यानंतर प्रतिक्रिया देताना दत्ता भरणे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारचे सगळे उमेदवार निवडून येणार हा विश्वास आहे.


दगाफटकाचा विषयच नाही. महाविकास आघाडी सरकारमधील सर्व आमदार एकत्र आहेत. आम्ही एकत्र आलो गप्पा झाल्या. कोणताही आमदार चुकायचा विषयच नाही. ते निश्चितच आघाडीला मतदान करतील. मी या निवडणुकीत पहिलं मतदान केले आहे, असे त्यांनी सांगितलं.


या निवडणुकीत एमआयएम आमदार हे महाविकास आघाडीला मतदान करणार आहेत. मालेगाव आणि धुळे विकास रखडला आहे तिथे आमचे आमदार आहे. विकास निधी मिळेल म्हणून आम्ही मतदान करत आहोत. लोकांच्या भल्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला मतदान करणार आहोत असे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं.