ओला, उबेर संपाचा तिसरा दिवस
ओला, उबेर संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. १९ मार्च पासून ओला, ऊबेर चालकांनी बेमुदत संप पुकारलाय. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे ही संपाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे ओला, उबेरच्या ज्या गाड्या रस्त्यावर दिसतायत त्यांना मनसे कार्यकर्ते रोखून धमकावतायत.
मुंबई : ओला, उबेर संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. १९ मार्च पासून ओला, ऊबेर चालकांनी बेमुदत संप पुकारलाय. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे ही संपाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे ओला, उबेरच्या ज्या गाड्या रस्त्यावर दिसतायत त्यांना मनसे कार्यकर्ते रोखून धमकावतायत.
तसंच जे गाड्या चालवतातय त्यांच्या गाड्यांची इतर चालक तोडफोड करतायत. चांगलं उत्पन्न मिळावं या मागणीसाठी ओला आणि उबेर चालकांनी हा संप पुकारलाय. आज ओला आणि उबेरचा संप आहे. चांगलं उत्पन्न मिळावं या मागणीसाठी ओला आणि उबेर चालकांनी बेमुदत संपाची हाक दिलीय.
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेनं हा संप पुकारलाय. ओला उबेरच्या ज्या गाड्या रस्त्यावर दिसतील, त्यांना मनसेचे कार्यकर्ते धमकावतायत. सायन चुना भट्टीमध्ये मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गाड्यांची तोडफोड केली. मुंबईत ओला, उबेरचे तीस हजार चालक आहेत. मुंबईकरांना याचा फटका बसणार आहे.
अनेक मुंबईकर शेअर ओला किंवा उबेरने ऑफिसला जातात. हा संप लक्षात घेता मुंबईकरांच्या सोईसाठी अतिरिक्त बसेस, आणि टॅक्सींची सोय करण्यात आलीय. तसेच नव्याने सुरू झालेल्या हायब्रीड एसी बसचा पर्यायही मुंबईकरांसाठी उपलब्ध असणार आहे.