मुंबई : राज्यात सर्वात दुर्लक्षित समाज हा तृतीयपंथी आहे. या समाजाने आपल्या काही मागण्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केल्या होत्या. यासाठी त्यांनी मंत्री मुंडे यांच्याकडे निवेदनही दिले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तृतीयपंथी समाजाने दिलेल्या निवेदनात संजय गांधी निराधार योजनेत प्राधान्याने समावेश करावा. शिक्षणाच्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या, समाजाने त्यांना अपमानजनक वागणूक दिल्यास कठोर शिक्षेची तरतूद करावी.


तृतीयपंथी समाजातील लोकांना राहण्यासाठी शासकीय वसतिगृहाची सोय व इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्या. या समुदायासाठी ओळखपत्र व इतर कागदपत्रे बनविण्यासाठी स्वतंत्र प्रणाली वापरून त्यांना कागदपत्रे उपलब्ध करुन द्यावी आदी मागण्या केल्या होत्या.


सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तृतीयपंथी समाजाच्या मागण्या अर्थमंत्री अजित पवर यांच्यापर्यत पोहोचविल्या. अर्थमंत्री अजित पवार यांनी या समुदायाच्या बहुतांश मागण्या नुकत्याच सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मान्य केल्या. यामुळे शिवसेना-युवासेना सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.


उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात यातल्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. त्याबद्दल शिवसेना-युवासेना सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.