पाहा नव्या सोयींनी परिपूर्ण मध्य रेल्वेची AC Local
....येथे झाली या लोकलची निर्मिती
मुंबई : इगतपुरीहून निघालेली AC Local एसी लोकल आता कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली आहे. लवकरच मुंबईकरांच्या सेवेत, Central Railway मध्य रेल्वेच्या ताफ्यात ही लोकल दाखल होणार असून, आता सुखकर प्रवासाचा त्यांना अनुभव घेता येणार आहे. चेन्नईच्या आयसीएफ रेल्वे कारखान्यात या लोकलची निर्मिती झाली आहे.
पुढील १५ दिवसांमध्ये मध्य रेल्वेच्या मुख्य लाईन, ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्ग अशा तिन्ही मार्गावर ही लोकल धावेल, अशी अपेक्षा आहे. काही दिवस तांत्रिक चाचणी केल्यानंतर ही लोकल मध्य रेल्वेवर सुरु होणार आहे. पश्चिम रेल्वेवर काही दिवसांपूर्वी ही लोकल सुरु करण्यात आली ज्यानंतर मध्य रेल्वेवर अशा प्रकारची लोकल प्रवाशांच्या सेवेत कधी येणार याचीच प्रतीक्षा अनेकांना लागली होती. आता मात्र ही प्रतीक्षा खऱ्या अर्थाने संपली असं म्हणायला हरकत नाही. झी२४तासच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून पाहा या लोकलचा खास फर्स्ट लूक.
'तान्हाजी...' म्हणजे एक मोठा योगायोग- देवदत्त नागे
ही आहेत या लोकलची काही वैशिष्ट्ये
- एसी लोकलची उंची ४२७० मिमी इतकी आहे.
- ही लोकल भेल कंपनीच्या बनावटीची आहे.
- एसी लोकलमध्ये अधिक आरामदायी आसनव्यवस्था
- आधुनिक हँडल आणि प्रवाशांना उभं राहण्यासाठी जास्त जागा
- बॅगांसाठी नव्या बांधणीचा रँक, टॉक बॅक सिस्टीम