मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मालाड स्टेशनजवळ बांद्रा-इंदौर एक्सप्रेसने रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या ४ महिलांना धडक दिली. या धडकेत ३ महिला ठार तर एक महिला गंभीररित्या जखमी झालीय. 


समोरून येणाऱ्या गाडीकडे दुर्लक्ष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जखमी महिलेवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालाड रेल्वे स्थानकाजवळ दुपारी 12.30 वाजता ही घटना घडली.  गोरेगाव-मालाड दरम्यान रेल्वे ट्रॅकवर काम करत असताना समोरून येणाऱ्या ट्रेनकडे दुर्लक्ष झाल्याने या तीन महिलांना धडक लागल्याची प्राथमिक माहिती आहे. 


मेगा ब्लॉक असल्यामुळे ट्रॅकवर काम


या रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक असल्यामुळे रेल्वे लाईनचे काम सुरू होते. त्याच दरम्यान हि घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांना घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतलेत. या घटनेचा पुढील तपास रेल्वे पोलीस करताहेत.