TISS Mumbai Bharti: टाटा ग्रुप हा देशभरात विश्वासआर्हतेसाठी ओळखला जातो. याचीच प्रचिती काही दिवसांपुर्वी  आली. टाटा इंस्टिट्यूट ऑफ सो शल सायन्सेस (TISS) मधून कर्मचारी कपात झाल्याची बातमी समोर आली होती. दरम्यान टाटा ग्रुपचे सर्व्हेसर्वा रतन टाटा यांनी यात मध्यस्थी करत कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचवल्या. दरम्यान टीस अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लीग ऑफिसर पदाची भरती केली जाणार आहे. देशभरातील टीसच्या मुंबई, हैदराबाग, गुवाहटी आणि तुळजापूर 4 कॅम्पसमध्ये ही भरती होईल. त्यातील मुंबईतील मुख्य कॅम्पसचाही समावेश आहे. येथे लॉ ऑफिसरच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. 


शैक्षणिक अर्हता 


लीगल ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून कायद्याची पदवी पूर्ण केलेली असावी. यावेळी उमेदवाराला 55 टक्क्यांहून अधिक गुण असावेत. तसेच लिगल ऑफिसर पदाचा किमान 3 वर्षे कामाचा किमान अनुभव असावा. उमेदवाराला मायक्रोसॉफ्ट ऑफिसची चांगली माहिती असावी. त्याचे संवाद कौशल्य चांगले असावे. 


अर्ज शुल्क 


अर्ज भरतावेळी उमेदवारांना 500 रुपये इतके शुल्क भरावे लागेल. 


पगार


या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 75 हजार रुपये इतका पगार दिला जाणार आहे. 


बॅंकेत नोकरी कशी मिळते? किती मिळतो पगार? सर्वकाही जाणून घ्या 


कसा कराल अर्ज?


लीगल ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अधिकृत वेबसाइटवर जाऊन भरतीसंदर्भातील लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर मागितलेली माहिती भरा. अर्ज शुल्क भरा. निवड झालेल्या उमेदवाराने 15 दिवसांच्या आत नोकरीवर रुजू होणे आवश्यक राहणार आहे, याची नोंद घ्या 


बॅंकेची नोकरी सोडून छोट्या दुकानातून आईसोबत इडली विकायला सुरुवात, आता दिवसाला..


अर्जाची शेवटची तारीख 


12 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी आढळल्यास, दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास अर्ज बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या. टीसची अधिकृत वेबसाइट https://www.tiss.edu/वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


गुगलमध्ये मिळाले 1.4 कोटींचे पॅकेज, प्रथम गुप्ता कुठून, काय शिकला?