अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस, शेतक-यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
विधिमंडळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होत आहे.
मुंबई : विधिमंडळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होत आहे. दरम्यान, आज सकाळी ५ वाजता शेतक-यांचा मोर्चा आझाद मैदानात पोहोचला.
शेतक-यांबाबत निर्णयाकडे लक्ष
आज विधानसभा आणि विधानपरिषदच्या सभागृहात माजी मंत्री पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहत दिसभरासाठी कामकाज तहकूब केले जाणार आहे. तेव्हा आझाद मैदानावर धडकणा-या शेतकरी मोर्चाच्या शिष्टमंडळाशी सरकार कधी आणि काय चर्चा करते, काय निर्णय घेते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यापेक्षा शेतकरी प्रतिनिधी हे सरकारबरोबरच्या चर्चेनंतर काय निर्णय घेतात, धरणे आंदोलन चालू ठेवणार का हे बघणे महत्त्वाचे ठरेल.
सहा मंत्र्यांची समिती
किसान सभा महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. या समितीत एकूण ६ मंत्री असतील. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा आणि सुभाष देशमुख या मंत्र्यांचा या समितीत समावेश असणार आहे.