मुंबई : आज राज्यात दिवसभरात सर्वाधिक 8641 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 84 हजार 281 इतकी झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज एका दिवसात राज्यात 266 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर आतापर्यंत राज्यात एकूण 11 हजार 194 जण दगावले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.94 टक्के इतका आहे.


राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत असल्याची दिलासादायक बाब आहे. आज राज्यात दिवसभरात 5527 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 58 हजार 140 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण-रिकव्हरी रेट 55.63 टक्के इतका आहे.



सध्या महाराष्ट्रात 1 लाख 14 हजार 648 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित एकट्या मुंबईत आहेत. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या 97,950 इतकी झाली आहे. त्यापैकी 67,830 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर 5523 जण दगावले आहेत. सध्या मुंबईत 24,307 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 


दरम्यान, राज्यात 7,10,394 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 42,833 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.