मुंबई : एलफिन्स्टन स्थानकावरील दुर्घटनेत २३ निरपराध मुंबईकरांचा जीव गेला. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रस्त्यावर उतरणार आहेत. 


किती वाजता आणि कुठून सुरू होणार मोर्चा?


मेट्रो सिनेमागृह चौकातून या मोर्चा सुरूवात होणार आहे. सकाळी ११.३० राज ठाकरे आल्यावर मोर्चाला सुरूवात होईल. महर्षी कर्वे रोड मार्गे मोर्चा रवाना होईल. आणि चर्चगेटच्या पश्चिम रेल्वे मुख्यालयजवळ मोर्चा येईल. त्यानंतर राज ठाकरे आणि विविध रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात जातील. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतील. शेवटी मोर्चाची सांगता करताना राज ठाकरे संबोधित करतील.



दरम्यान, रेल्वेच्या प्रश्नावर मनसेकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले असून, सोशल मीडियावरही फोटो शेअर करुन मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत आहे.