मुंबई : आज राज्यात 8968 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर आज 266 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात दररोज कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असताना कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढतं आहे. आज दिवसभरात 10,221 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4,50,196 इतकी झाली आहे. सध्या राज्यात 1,47,018 जण ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 


राज्यात आतापर्यंत 2,87,030 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 63.76 टक्के इतका झाला आहे. आतापर्यंत राज्यात 15,842 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.52 टक्के इतका आहे.



दरम्यान, महाराष्ट्रात सर्वाधित कोरोना रुग्ण संख्या एकट्या मुंबईत आहे. मुंबईत 1,17,406 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यापैकी 90089 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मुंबईत 6493 जण कोरोनामुळे दगावले आहेत. सध्या मुंबईत 20,528 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 


सध्या राज्यात 9,40,486 जण होम क्वारंटाईन आहेत. तर 37,009 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.