स्वाती नाईक, झी मीडिया, मुंबई : सध्या टॉमी अॅटकीन या नावाची नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चर्चा आहे. अवकाळी पावसामुळे यंदा महाराष्ट्राच्या आंब्याचं आगमन उशीराने होतं आहे. त्यामुळे सध्या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत साऊथ आफ्रिकेतील टॉमी याटकीनची चर्चा आहे. लाल चुटुक रंगाचा हा आंबा 300 रुपये किलो घाऊक मार्केटमध्ये विकला जातो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समुद्रमार्गाने आंब्याचा एक कंटेनर आला असून जवळपास साडेपाच हजार पेट्या मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत. दोन दिवसात अडीच हजार पेटी आंबा विकलाही गेला आहे. लग्नसराईत आणि मॉलमध्ये हा आंबा विकला जातो आहे.


चवीला कमी गोड असल्याने हा आंबा मधुमेही रुग्णांच्या पसंतीला उतरतो आहे. महाराष्ट्राचा आंबा बाजारात दाखल होईपर्यंत साऊथ आफ्रिकेचा हा टॉमी महाराष्ट्रात भाव खाऊन जातो आहे हे मात्र खरं.