मुंबई : Mumbai Local News : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागपूर-मुंबई एक्स्प्रेसचा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे खर्डीजवळ ती बंद पडली. त्यामुळे कसाऱ्याकडून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईकडे येणाऱ्या अनेक लांबपल्ल्याच्या गाड्याही अडकल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण जवळील खर्डी स्टेशन जवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसमध्ये बिघाड झाल्यामुळे ही एक्सप्रेस उभी आहे. त्यामुळे मुंबई अप दिशेच्या लोकल गाड्यांची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. ऐन गर्दीच्या वेळेत लांब पल्ल्याच्या गाडीत हा बिघाड झाल्याने ऑफिसला निघालेल्या प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.


दुरांतो एक्स्प्रेसमध्ये ( Nagpur-Mumbai Duranto Express) बिघाड झाल्याने याचा परिणाम मध्य रेल्वेच्या मुंबई लोकल सेवेवर झाला आहे. अनेक लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांना लेटमार्कचा सामना करावा लागणार आहे.