`आत्मक्लेष यात्रे`मुळे चाकरमान्यांनाही क्लेष
आज दक्षिण मुंबईच्या रस्ते वाहतुकीचे तीन तेरा वाजलेत.
मुंबई : आज दक्षिण मुंबईच्या रस्ते वाहतुकीचे तीन तेरा वाजलेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांची आत्मक्लेश यात्रा आज लालबाग ते राणीची बाग, टप्पा पार करण्यासाठी रस्त्यावर उतलेत. शेट्टींची ही यात्रा राणीच्या बागेत थांबवण्यात आलीय.
दरम्यान, या यात्रेमुळे परळ ते भायखळा परिसरात मोठी वाहतूक कोंडी झालीय. संध्याकाळी 5 वाजता शेट्टी आणि १० जणांचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट आहेत.