राज्यातले प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स संपावर
मुंबई : राज्यभरातल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी संप पुकारलाय. स्टायपेंड अर्थातच विद्यावेतनामध्ये वाढ करावी या मागणीसाठी राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी संप पुकारलाय. महाराष्ट्रातले जवळपास तीन हजार प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर जात असल्यानं रुग्णालयांमधली सेवा विस्कळीत होऊन रुग्णसेवेला फटका बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात खासगी रुग्णालयांमध्ये 2300 प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स आहेत तर महापालिकेच्या रुग्णांलयात ४०० प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स आहेत. या संपाला मार्डनंही पाठिंबा दिलाय. सध्या या प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सना दर महिना सहा हजारांच्या आसपास विद्यावेतन मिळतं. ते अकरा हजार करावं, अशी या डॉक्टर्सची मागणी आहे. नेमक्या काय आहेत प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या मागण्या... पहा वरील व्हिडिओच्या माध्यमातून...