परी म्हणू की अप्सरा! धारावीतल्या झोपडपट्टीत राहाणारी मलीशा बनली Brand Ambassador, पाहा फोटो
डोक्यावर छत नव्हतं, पोटभर जेवण नव्हतं... पण रातोरात तिचं नशीब बदललं. ज्या मुलीला परिसरातही कोणी ओळखत नव्हतं ती मुलगी आज सोशल मीडियावर स्टार बनली आहे. एका मोठ्या प्रोडक्टची ती ब्रँड अँम्बेसेडर बनली आहे
Maleesha Kharwa : काही वर्षांपूर्वी स्लम डॉग मिलेनिअर (Slumdog Millionaire) नावाचा एक चित्रपट आला होता. मुंबईतल्या धारावी झोपडपट्टीतला (Dharavi Slum) एक मुलगा एका टीव्ही कार्यक्रमात भाग घेतो आणि करोडपती बनतो अशी त्या चित्रपटाची कथा आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरला. चित्रपटातील कथा आणि गाण्यांमुळे तो प्रेक्षकांच्या मनाला भिडला. पण हा चित्रपट झाला. खरंच सत्य परिस्थितीत असं होऊ शकतं का? चित्रपटात किंवा फारतर स्वप्नात अशा गोष्टी घडू शकतात. पण प्रत्यक्षात अशी घडली आहे. धारावी झोपडपट्टीतली एक मुलगी एका प्रोडक्टची ब्रँड अॅम्बेसेडर (Brand Ambassador) बनली आहे. आज सोशल मीडियावर याच मुलीच्या नावावाची चर्चा आहे.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
मुंबईतल्या धारावी झोपडपट्टीत राहाणारी 14 वर्षांची एक मुलगी, तिला तिच्या परिसरातही फारसं कोणी ओळखत नव्हतं. पण लाखो लोकं तिच्याबद्दल चर्चा करतायत. सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. या मुलीचं नाव आहे मलीशा खारवा (Maleesha Kharwa)
कोण आहे मलीशा खारवा
मलीशा खारवा ही सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. नुकतंच तिला प्रसिद्ध ब्यूटी प्रोडक्ट (Beauty Products) असलेल्या फॉरेस्ट एसेंशियल्स (Forest Essentials) या कंपनीने आपलं ब्रँड अॅम्बेसेडर बनवलं. फॉरेस्ट एसेंशियल्सचा 'द युवती' कलेक्शनचा (Yuvathi Collections) ती चेहरा बनलीय. यानंतर मलीशाच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली असून ती कोण आहे याबाबत लोकांच्या मनात उत्सुकता वाढली आहे.
मलीशाचा व्हिडिओ व्हायरल
मलीशा खारवाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती फॉरेस्ट एसेंशियल्सच्या स्टोरमध्ये येते. तिथे आपले पोस्टर्स पाहून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहाताना दिसत आहे. एखाद्या सेलिब्रेटीसारखे तिचे बॅनर दुकानात लागलेले पाहिला मिळतायत. तीन कधी स्वप्नातही विचार केला नसेल की आपला चेहरा एखाद्या प्रोडक्टवर छापला जाईल. हा व्हिडिओ आतापर्यंत 50 लाखाहून अधिकवेळा पाहिला गेला आहे.
मलीशाची कारकिर्द
खरंतर मलीशाची मॉडलिंग कारकिर्द 2020 मध्ये सुरु झाली. त्यावेळी हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमॅनने तिला पाहिलं होतं. रॉबर्ट एका म्यूझिक व्हिडिओच्या शुटिंगसाठी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांची नजर मलीशावर पडली. त्यांनी मलीशाच्या मदतीसाठी काऊड फंडिंग अकाऊंटही सुरु केलं होतं. त्यात आतापर्यंत जवळपास 10.7 लाख रुपये जमा झाले आहेत.
मलीशाने अनेक मॉडलिंग इव्हेंटमध्येही भाग घेतला आहे. याशिवाय Live Your Fairy Tale या शॉर्टफिल्ममध्ये तीने भूमिका साकारली आहे. पण फॉरेस्ट एसेंशियल्सचं ब्रँड अँम्बेसेडर होणं हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं यश असल्याचं मलीशा म्हणते. मलीशा मॉडलिंगबरोबर आपल्या अभ्यासावरही लक्ष देतेय.
मलीशाचे इन्स्टाग्रामवर दोन लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या अकाऊंटवर मलीशा मॉडलिंगचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. या फोटोला लाखो व्ह्यूज मिळतात.