मुंबई : आपल्या एक्ससोबत मैत्री करण हे कठीण असतं. कारण त्याच व्यक्तीशी पुन्हा संपर्कात आल्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतात. आणि त्याचा त्रास होतो. त्यामुळे त्या नात्यातून बाहेर पडण कठीण होत असतं. कारण ज्या व्यक्तीवर आपण एकेकाळी मनापासून प्रेम केलं त्या व्यक्तीसोबत आता मैत्रीचं नातं ठेवणं थोडं कठीण होतं. खूप कमी लोकं असतात जे आपल्या एक्ससोबत मैत्रीचं खूप चांगल नातं टिकवतात. जर तुम्हाला खरंच आपल्या एक्ससोबत मैत्रीचं नातं ठेवायचं असेल तर काही गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1) जुन्या आठवणी काढू नका?


कधीही आपल्या एक्ससोबत जुन्या आठवणींना उजाळा देऊ नका. तसेच त्याच्यावर चर्चा करू नका. ज्यामुळे तुमच्या आताच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. 


2) नवीन पार्टनरबद्दल बोलू नका 


जर तुम्हाला खरंच तुमच्या एक्ससोबत मैत्री ठेवायची असेल तर तुमच्या आताच्या पार्टनरबद्दल कोणताही विषय काढू नका. तसेच त्या पार्टनरला देखील त्याच्या लव लाईफबद्दल विचारू नका. यामुळे ती व्यक्ती इमोशनल होऊ शकते. असं केल्यामुळे दोघांनाही त्रास होऊ शकतं. 


3) पॅचअप 


अनेक कपल्स कोणत्यातरी कारणामुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतात. पण ते चांगले मित्र म्हणून राहतात. अनेकदा असं झालं होतं की, ही मैत्री पुढे पुन्हा एकदा प्रेमात पडते. ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना याचा त्रास होऊ शकतो.