Crime News : शीना बोरा हत्या प्रकरणात (Sheena Bora Murder Case) आताची मोठी बातमी समोर आली आहे.  शीना बोरा हिची खरंच हत्या झाली का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. शीनाची जर हत्या झाली तर ती नेमकी कधी झाली, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. राहुल मुखर्जीच्या (Rahul Mukharjee) उलट तपासणीत धक्कादायक माहोती समोर आली आहे. इंद्राणी मुखर्जीचे (Indrani Mukharjee) वकील रणजीत सांगळे यांच्या उलट तपासणीला उत्तर देताना राहुल गडबडला. तसंच राहुल आणि शीना यांच्यातील रिकव्हर मोबाईल कॉल्स (Mobile Calls) आणि मेसेजेस (Messeges) यावर आधारीत माहिती आणि वास्तविक माहिती यात तफावत असल्याचं उघड झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस रेकॉर्डवरील FIR आणि सुनावणीत शीनाची हत्या झाल्याची तारीख 24 एप्रिल 2012 आहे.  तर राहुल आणि शीनाच्या मेसेज संभाषणात शीनाला मिळालेला पगाराची तारीख सप्टेंबर 2012 मधली आहे. 2012 च्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यात राहुल आणि शीना यांच्यात अनेकवेळा मेसेजद्वारे संभाषण झाल्याची माहिती आहे. मार्च 2013 मध्येही दोघांत संवाद असल्याचा तांत्रिक पुरावा समोर आला आहे. 


इंद्राणी मुखर्जीचा जबाब
याआधीही मुलगी शीना बोराच्या निर्घृण हत्येप्रकरणी  इंद्राणी मुखर्जीने खळबळजनक दावा केला होता. शीना जिवंत आहे, तपासयंत्रणांनी तिचा शोध घ्यावा, असं पत्र इंद्राणीने CBI ला लिहिलं होतं.  शीना बोरा हिचा तपास काश्मिरात करावा, असंही तीने म्हटलं होतं. या प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) करीत आहे.  एकेकाळची मीडिया टायकून इंद्राणी मुखर्जीला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शीना बोरा हत्येप्रकरणी 2015 मध्ये अटक केली होती. वैद्यकीय कारणंमुळे सुप्रीम कोर्टाने इंद्राणी मुखर्जी हिला जामीन दिला आहे. 


काय आहे शीना बोरा हत्या प्रकरण?
टीव्ही इंडस्ट्रीमधील नावाजलेला चेहरा असलेल्या इंद्राणी मुखर्जी आणि मीडिया टायकून म्हणून ओळख असलेल्या पीटर मुखर्जी (Peter Mukharjee) यांची शीना बोरा ही मुलगी. शीना बोरा पीटर मुखर्जी यांची सावत्र मुलगी होती. 2012 मध्ये शीना बोराची हत्या झाली. इंद्राणी मुखर्जीने एका कारमध्ये गळा दाबून शीनाची हत्या केल्याचा जबाब तिच्या ड्रायव्हरने दिला होता. याप्रकरणी इंद्राणी आणि तिचा पहिला पती संजीव खन्ना याला अटक करण्यात आला. मुलीच्या हत्येत मदत केल्याप्रकरणी आणि पुरावे नष्ट केल्याच्या प्रयत्नात संजीव खन्नाला अटक करण्यात आली. 


पीटर मुखर्जी हा इंद्राणीचा दुसरा पती. पीटर मुखर्जी याचा मुलगा राहूल आणि शीना बोरा यांच्या जवळीक होती. 2012 नंतर शीना अचानक बेपत्ता झाल्यानंतर राहुलने तिचा खूप शोध घेतला. पण यानंतर शीनाची हत्या झाल्याचं समोर आलं. इंद्राणीने शीनाचा कारमध्ये गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह रायगड जिल्ह्यात पुरल्याचं उघड झालं. शीनाचे अवशेषही केंद्रीय यंत्रणांना सापडले होते.