मुंबई : घाटकोपर पूर्वच्या माता रमाबाईनगरमध्ये असलेल्या जॉय मॅक्स या शाळेच्या छतावर असलेल्या नारळाच्या झाडावरून नारळ पडून दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या. 


फराह सलीम सय्यद आणि प्रणाली मोरे या पाच वर्षांच्या विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. दोघींवर राजावाडी रूग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आलं. झाडाचा मालक सुरेश पुजारीवर निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.