मुंबईत दरोडा प्रकरणात दोघा पोलिसांना अटक, चोरीचे हिरे पकडल्याचा बनाव
बोरीवली पोलिसांनी दरोड्याचा एका प्रकरणात चक्क दोघा पोलिसांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.चंद्रकांत गवरे आणि संतोष गवस अशी दोघांची नावे आहे.
मुंबई : बोरीवली पोलिसांनी दरोड्याचा एका प्रकरणात चक्क दोघा पोलिसांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.चंद्रकांत गवरे आणि संतोष गवस अशी दोघांची नावे आहे.
या दोघांनी आपल्या साथीदारांसोबत मिळून चक्क एक हिऱ्याच्या व्यापाऱ्याच्या दुकानात दरोडा घातला.त्याच्याकडील २४ लाखांचे हिरे घेऊन पसार झाले होते. या दोघांना पोलिसांनी अटक केली असून १३ लाखांचे हिरे देखील पोलिसांनी जप्त केले आहेत.
बोरीवलीतील बाभई परिसरात जयेश झवेरी यांचं ऑफिस आहे. हिऱ्याचे व्यापारी असलेले जयेश भाई आपल्या ऑफिस मधून देखील अनेकदा हिऱ्यांच्या डील करतात. बुधवारी आपल्या ऑफिसमध्ये सुरत येथील व्यापाऱ्याशी डील सुरू असतानाच अचानक काही लोक जयेश झवेरी यांच्या ऑफिसात घुसले. त्यातील एक इसम तर चक्क पोलीस गणवेशात होता तर दुसऱ्याने त्याची ओळख ही पोलीस अशीच केली यावेळी आपलं ओळखपत्र देखील त्याने दाखवलं.
त्यानंतर पोलीस अधिकारी मित्राकडे चौकशी केली असता असा कोणताही गुन्हा दाखल नसल्याचं मला सांगितले आणि तात्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करायला सांगितलं. सीसीटीव्ही फुटेज बघता क्षणी पोलीस समजून चुकले की हे काही तोतया पोलीस नाहीत.
तात्काळ तपासाची चक्र फिरली आणि दोघा पोलिसांसह अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली. यावेळी एलएच्या चंद्रकांत गवारे आणि संतोष गवस यांच्यासह बोरीवली पोलिसांनी प्रणय शहा आणि एका आरोपीला अटक केली आहे.