मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर लोकल ट्रेनचे दोन डबे घसरले आहेत. १.४०च्या कर्जत फास्ट लोकलचे दोन डबे घसरल्याची घटना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ हज हाऊसच्या इकडे घडली आहे. सुदैवानं या अपघातामध्ये कोणीही जखमी झालं नाही. दुपारी १.४५च्या सुमारास हा अपघात घडला होता.