मराठा क्रांती मोर्च्यातून परतणार्या २ तरूणांचा दुर्देवी अंत !
वडाळा परिसरात भरधाव वेगाने येणार्या ट्रकने एका दुचाकीला दिलेल्या धडकेत 2 तरूण मृत्यूमुखी पडले आहेत. तर एक जण गंभीर जखमी आहे.
मुंबई : वडाळा परिसरात भरधाव वेगाने येणार्या ट्रकने एका दुचाकीला दिलेल्या धडकेत 2 तरूण मृत्यूमुखी पडले आहेत. तर एक जण गंभीर जखमी आहे.
धडक दिलेल्या ट्रक चालकास अटक करण्यात आले आहे. मृत्यूमुखी पडलेले तरूण मराठा क्रांती मोर्च्यातून घरी परतत होते. असे सांगण्यात येत आहे.
विनायक ढगे, सिद्धेश मासे या दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे तर सिद्धेश चव्हाण हा गंभीर जखमी असून त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे. हे तिन्ही तरूण मराठा क्रांती मोर्च्यामध्ये सहभागी होऊन चेंबूर येथे पुन्हा परतत होते अशी माहिती 'एबीपी माझा'ने दिली आहे.
वडाळा येथील भक्ती पार्क सर्कल येथे विनायक रस्ता ओलांडून सिद्धेशी बोलण्यासाठी जात होता. मात्र त्याचवेळेस समोरून येणार्या भरधाव ट्रक तिन्ही तरूणांना धडक देत दुभाजकावर चढला. यामध्ये विनायकचा जागीच मृत्यू झाला. जखमी सिद्धेश मासेची उपचारादरम्यान मृत्यूशी चालू असलेली झूंज अपयशी ठरली. तर सिद्धेश चव्हाणची प्र्कृती चिंताजनक आहे.