मुंबई : Uddhav Thackeray's Letter :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray ) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला खरमरीत पत्र लिहिले आहे. निवडणूक आयोगाकडून (Election Commission) आम्हाला सापत्न वागणूक मिळत आहे. त्याचवेळी आम्ही दिलेल्या कागदपत्रांची माहिती शिंदे गटाला कशी मिळते, असा सवाल ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला विचारला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाव, चिन्हं वाटपात शिंदे गटाला झुकतं माप कसं काय मिळत आहे. चार पानी पत्रामध्ये ठाकरे गटाने निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. आयोग आमच्या पक्षासोबत भेदभाव करीत आहे, असा आरोप ठाकरेंनी केला आहे.


जो पक्ष निवडणूक लढवीत नाही तरी पण त्याच्यासाठी आमच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह रद्द केले जाते,असा आरोप केला आहे. नाव, चिन्ह वाटपात शिंदे गटाला झुकतं माप देण्याचा आल्याचा गंभीर आरोप निवडणूक आयोगावर करण्यात आला आहे. दरम्यान,  शिंदे गटाने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.


ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला खरमरीत पत्र  


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडणूक खरमरीत पत्र.


शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक आगोगाला लिहिण्यात आलेल्या या पत्रावर शिंदे गटाकडून टीका करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आमच्या पक्षाला सापत्य वागणूक देत आहे.


आयोग आमच्या पक्षासोबत भेदभाव करीत आहे.


आयोग प्रतिवादी एकनाथ शिंदे गटाला प्राधान्य देतेय, ठाकरेंचा आयोगावर आरोप 


शिंदे गट निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर देखील कागदपत्र देत नाही.


आम्ही दिलेलं कागदपत्र शिंदे गटाला दिले जाते, पण त्यांची आम्हाला मिळत नाहीत, हे असं कसं?


जो पक्ष निवडणूक लढवीत नाही तरी पण त्याच्यासाठी आमच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह रद्द केले जाते.