उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच विमानातून येणार?
सिंधुदुर्गमध्ये विमान उतरणार
मुंबई : अखेर सिंधुदुर्गमध्ये 12 सप्टेंबरला तारखेला विमान उतरण्याच मुहूर्त पक्का झाला आहे. गेले काही दिवस विमान उतरण्यावरुन श्रेयाच राजकरण सुरु होतं. त्यातच आता नवी उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विमानतळाच्या चाचणीसाठी उतरणाऱ्या विमानात नारायण राणे आणि उद्धव ठाकरे दोघेही एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
चाचणी खातर उतरवण्यात येणाऱ्या विमानात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर एकत्र प्रवास करणार आहेत. नुकतेच राज्यसभेत खासदार म्हणून गेलेले नारायण राणे या विमानात असणार का याबाबत सध्या तरी निश्चित माहिती हाती आलेली नाही.