मुंबई: जदयू नेते आणि निवडणूक रणनीती तज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी मंगळवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे शिवसेना-भाजप यांच्यातील युतीच्या चर्चेला खऱ्या अर्थाने वेग आला आहे. उद्धव ठाकरे आणि प्रशांत किशोर यांच्यात सुमारे दोन तास चर्चा सुरु होती. या चर्चेचा तपशील 'झी २४ तास'च्या हाती लागला आहे. या भेटीदरम्यान प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरे यांना सबुरीने वागण्याचा सल्ला दिला. शिवसेना मोठा पक्ष आहे, मी सामान्य माणूस आहे. त्यामुळे तु्म्हाला युतीसंदर्भात जे करायचं ते करा. नवरदेव आणि वऱ्हाडी तुम्हीच आहात. मात्र, थोड्या जागांसाठी लग्न का मोडता? २४-२४ अशा समसमान जागा लढण्याच्या प्रस्तावात काय वाईट आहे, असा सवाल प्रशांत किशोर यांनी उद्धव यांना विचारला. शिवसेना २५-२३ अशा जागावाटपासाठी आग्रही आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना-भाजप युतीवरून कलगीतुरा, उमेदवार हवालदिल


दरम्यान, यावेळी शिवसेनेच्या सर्व खासदारांनाही मातोश्रीवर बोलवण्यात आले होते. तेव्हा प्रशांत किशोर यांनी या सगळ्यांशी संवाद साधल्याचे समजते. त्यांनी खासदारांसमोर एक प्रेझेंटेशनही दिल्याचे समजते. त्यामुळे आतातरी शिवसेना-भाजपची युती होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची गुप्तपणे खलबतेही सुरू आहेत. मात्र, शिवसेनेचे नेते जाहीरपणे युतीबद्दल काहीच सांगायला तयार नाहीत. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लाचारी पत्कारून युती करणार नाही, अशी गर्जना केली होती. तर शिवसेना कायमच मोठा भाऊ होता आणि राहील, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली होती. 


अमित शहांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; युतीसाठी घातली गळ