मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे.. मेट्रो कारशेडचा ठाकरे सरकारचा आदेश शिंदे-फडणवीस सरकारने फिरवला आहे...असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या महाधिवक्ता यांना दिलेत. याबाबत शासनाची बाजू कोर्टासमोर मांडावी, असं त्यांनी सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलंय. तसंच जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव आणा, असे निर्देशही फडणवीसांनी अधिका-यांना दिल्याचं सांगितले जात आहे. यावर निर्णयावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Uddhav Thackeray Live : उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयावर टीकास्त्रा सोडले, ते म्हटले की, 'मला आज एका गोष्टीचं वाईट वाटत आहे, माझ्यावर राग आहे तर माझ्यावर राग काढा, माझ्या पाठित वार करा, पण मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका. आरेचा जो निर्णय त्यांनी बदलला त्याचं मला दुख: झालं आहे.'

'हा कोणचा खाजगी प्लॉट नाहीए, कोणत्याही बिल्डरला तो आंदन देत नाही आहोत, तिथे जी काही पर्यावरणासाठी आवश्यक वनराई आणि जंगलं होती ती एका रात्रीत झाडाची कत्तल झाली. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला स्टे दिला होता. स्टे दिल्यानंतर मुंबईच्या विकासाआड मी येत होतो का तर अजिबात नाही. मी त्यांना कांजुरमार्गचा पर्याय सुचवला.' असेही ठाकरे म्हणाले.

'कदाचित त्यांना वाटत असेल त्यांचं बरोबर आहे, पण मी पर्यावरणावादी आणि पर्यावरणाच्या सोबत आहेत. जेव्हा असा संभ्रम निर्माण होतो, तेव्हा ती गोष्ट टाळलेली बरं असं माझं स्पष्ट मत आहे.

आजही माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, की कृपा करुन माझा राग मुंबईवर काढू नका, मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका, कांजुरमार्गचा प्रस्ताव जो आम्ही दिलेला आहे,  त्यात कुठेही अहंकार नाही. मी मुंबईकरांच्या वतीने हात जोडून विनंती करतोय की आरेचा आग्रह रेटू नका, जेणेकरुन पर्यावरणाला हानी पोहचेल.' असे आवाहन ठाकरे यांनी नवीन सरकारला केले आहे.