मुंबई :  ही फोडाफोडी नसून घरवापसी आहे, मनसेतून शिवसेनेत आलेले हे सर्व नगरसेवक हे मूळचे शिवसैनिकच आहेत त्यामुळे ते आमचेच आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल झालेल्या पोटनिवडणुकीनंतर भाजपच्या नगरसेवकांची संख्या वाढल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर मनसेचे सहा नगरसेवकांनी आज सायंकाळी गट स्थापन करून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत मातोश्रीवर उद्धव ठाकरे बोलत होते. 


शिवसेनेला मिळालेल्या यशामुळे भाजपच्या पोटात मुरडा आला आहे. तो मुरडा त्यांना मुबारक... गोवा आणि अरूणाचल प्रदेशात भाजपने जे काही केले, तसाच प्रयोग हा मुंबई महापालिकेत करण्यात आला. त्यामुळे त्यांनी केले तसेच आम्ही केले असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.