`तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो`, उद्धव ठाकरे यांचे एकनाथ शिंदेना थेट आव्हान
Political News : शिवसेना ( Shiv Sena) आणि धनुष्यबाण हातातून निसटल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना थेट आव्हान दिले आहे.
Uddhav Thackeray : शिवसेना ( Shiv Sena) आणि धनुष्यबाण हातातून निसटल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना थेट आव्हान दिले आहे. (Maharashtra Politics) आज मुंबईत मातोश्रीबाहेर उद्धव ठाकरे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ( Political News ) यावेळी धनुष्यबाण चोरल्याचा आरोप उद्धव यांनी केला. तुम्ही आता निवडणुकीला सामोरं या. आम्ही मशाल घेऊन लढू, असे यावेळी उद्धव म्हणाले. ( Maharashtra Political News in Marathi )
शिवसेना हातातून निसटल्यानंतर ठाकरे यांचे मोठे पाऊल
दरम्यान, धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव हातातून निसटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आता मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे आता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहेत. 'शिवसेना' आणि 'धनुष्य बाण' चिन्हावर दावा केला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गटाकडून सोमवारी याचिका दाखल करण्यात येणार आहे. ठाकरे गटाच्या लिगल टीमने त्यासाठी तयारी केली आहे.
Uddhav Thackeray : आता उद्धव ठाकरे 'शिवसेना' हे नाव वापरु शकतात का?
उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो, निवडणुकीला सामोरं जाऊया. धनुष्यबाण चिन्ह शिंदेंकडे गेल्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मातोश्रीच्या बाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमा झाले. यावेळी निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उद्धव ठाकरेंनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर मातोश्रीवर आमदार, खासदारांची आज बैठकही बोलावण्यात आली आहे.
'मशाल' हे निवडणूक चिन्हं पोटनिवडणुकीपर्यंत वैध
ठाकरे गटाला मिळालेलं मशाल हे निवडणूक चिन्हं पोटनिवडणुकीपर्यंत वैध आहे. 26 फेब्रुवारीपर्यंतच हे चिन्हं आणि पक्षाचं नाव वापरण्याची मुदत आहे. त्यामुळे 26 फेब्रुवारीनंतर हे चिन्हं वापरता येणार नाही. तशी ऑर्डरच निवडणूक आयोगाने काढली आहे. ठाकरे गटाला हा नवा धक्का मानला जात आहे.
नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी किंवा नवीन नाव आणि चिन्ह घेण्यासाठी ठाकरे गटाला पुन्हा निवडणूक आयोगाकडे जावं लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे गटाने शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर हक्क सांगितला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवलं होतं. त्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्हं देण्यात आलं. मात्र आता या महिन्यातच ही मुदत संपत आहे.