`दबाव न ठेवता अनधिकृत बांधकामावर कारवाई करा`
शिवसेना त्यांच्या सोबत असेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
मुंबई : कोणत्याही बड्या नेत्याचा मुलाहिजा न ठेवता, दबाव न बाळगता अनधिकृत बांधकामावर आयुक्तांनी कारवाई करावी,शिवसेना त्यांच्या सोबत असेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
महाराष्ट्रातल्या इतर विषयांवर नंतर बोलू...
काही वेळा पूर्वी त्यांनी शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन कमला मिल अग्नितांडव मुद्द्याला हात घातला.मात्र भीमा कोरेगाव आणि महाराष्ट्रातल्या इतर विषयांवर नंतर बोलू असं त्यांनी सांगितलंय.
कमला मिलमधील आग आणि एलफिन्स्टन ब्रीजवरील चेंगराचेंगरी या प्रकरणांमुळे मुंबईतील हे सर्व मुद्दे पुन्हा चर्चेत आले आहेत.