CM Uddhav Thackeray Sabha Live : मुंबईत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जाहीर सभा घेतली. बीकेसी मैदानावर शिवसेनेची ही जाहीर सभा पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सभेत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केलीये. भोंग्यांच्या वादवर देखील उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.


मुख्यमंत्र्यांची राज ठाकरे यांच्यावर टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सभेत बोलताना म्हटलं की, 'एका शिवसैनिकाने मला विचारलं लगे रहो मुन्नाभाई पाहिला का? ज्यात संजय दत्तला गांधीजी दिसतात. तशीच एक केस आपल्याकडे आहे. ज्याला स्वत:ला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतंय. कधी मराठी तर हिंदुत्वाच्या नादाला लागतात.'


'हा मुन्नाभाई भलं तरी करत होता. हा कुठला मुन्नाभाई. ही केमिकल लोचाची केस आहे. अनेक मुन्नाभाई फिरत आहेत. फिरु द्या. आता काही लोकं आयोध्येला जाताय. जावू द्यात. '


राज्यभरातून शिवसैनिक या सभेसाठी मुंबई दाखल झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, तसेच नवनीत राणा यांच्यावर उद्धव ठाकरे काय बोलतील याबाबत सर्वांमध्येच उत्सूकता होती.


राज्यात गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसा, हिंदुत्व तसेच भ्रष्टाचारावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.