Aaditya vs Amit : दोन ठाकरेंमध्ये थेट लढत; निवडणुक जिंकण्यासाठी मनसे शिंदे गटाला सोबत घेणार?
या निवडणुकीत उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) आणि राज ठाकरे(Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे(Amit Thackeray) यांच्यात थेट लढत होणार आहे. या निवडणुकींच्या निमित्ताने ठाकरेंच्या नव्या पिढीची लढाई होणार आहे.
Aaditya vs Amit Thackeray : राज्याच्या राजकारणात दोन ठाकरेंमध्ये पुन्हा थेट लढत होणार आहे. निमित्त आहे सिनेट निवडणुकीचे. महापालिकांपूर्वीच ठाकरे आणि विरोधक सिनेटच्या निवडणुकीत(Mumbai University Senate Election) एकमेकांना भिडणार आहेत. या निवडणुकीत उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) आणि राज ठाकरे(Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे(Amit Thackeray) यांच्यात थेट लढत होणार आहे. या निवडणुकींच्या निमित्ताने ठाकरेंच्या नव्या पिढीची लढाई होणार आहे.
मागील दहा वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या युवासेनेच्या सिनेटचा गड काबिज करण्यासाठी मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरेंनी जोरदार तयारी सुरू केलीय. आदित्य ठाकरेंना आव्हान देण्यासाठी मनविसे शिंदे गट आणि अभाविपलाही सोबत घेण्याची चर्चा रंगू लागली आहे. सिनेट निवडणूकीसाठी अमित ठाकरेंनी मोठी रणनीती आखल्याचंही बोललं जातंय.
महापालिकांपूर्वीच ठाकरे आणि विरोधक सिनेटच्या निवडणुकीत एकमेकांना भिडणार
आदित्य ठाकरेंना रोखण्यासाठी अमित ठाकरेंचा प्लॅन?
शिंदे गट, अभाविपच्या मदतीनं मनविसे झेंडा फडकवणार?
शिंदेंच्या बंडानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्याच निवडणुकांची गणितं बदलली आहेत
यंदा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत राडा, पंगा आणि धुरळा होणार
गेल्या दहा वर्षांपासून मुंबई विद्यापीठाच्या सीनेटवर आदित्य ठाकरेंची सत्ता
शिंदे गटाची ताकद वाढली तर त्याचाही मनसेला फायदा होण्याची शक्यता आहे
या निवडणुकीत जो जिंकेल तोच मुंबई महापालिकेत सत्तेत येतो, असा आतापर्यंतचा इतिहास