मुंबई : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आमदार नीतेश राणे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून गझनी म्हटले आहे.. नीतेश यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना 'गझनी' चित्रपटातील आमीर खानच्या भूमिकेशी केली आहे. उद्धव हे 'महाराष्ट्राचे गझनी' आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'गझनी' चित्रपटात आमीर खानला विस्मरणाचा आजार जडलेला असतो. त्यावर उपाय म्हणून आमीर खान आपल्या आयुष्यातील विविध घटना, व्यक्ती व प्रसंग शरीरावर गोंदवून ठेवत असतो. उद्धव यांचीही सध्या तशीच अवस्था असल्याचं नीतेश यांनी सूचित केलं आहे.


 उद्धव यांची 'गझनी'शी तुलना करणारं एक रेखाचित्रच नीतेश राणे यांनी ट्विट केलं आहे. या चित्रावर त्यांनी शिवसेनेच्या परस्परविरोधी भूमिकांचा उल्लेख केला आहे.  नीतेश यांचं हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.


  'महाराष्ट्राचा गझनी' असा मथळाही या चित्राला देण्यात आला असून, त्यावर ‘भाजप आमचा मित्र पक्ष आहे,’ ‘एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला विरोध,’ ‘जीएसटीला विरोध,’ ‘कर्जमाफीला विरोध,’ ‘मी सत्तेत आहे,’ आणि ‘समृद्धीला शिवसेनेचा विरोध आहे,’ यावर उद्धव यांची वक्तव्य लिहिण्यात आली आहेत.