निवडणूक यंत्रणाही भ्रष्ट, सर्वपक्षीयांनी खटला दाखल करावा - उद्धव ठाकरे
भाजपनं वाळीत टाकलेला वनगा परिवार भेटण्यासाठी आला आणि निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी दिवंगत भाजप नेते आणि कृषीमंत्री पांडुरंगा फुंडकर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं. पालघर पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर शिवसेनेने पत्रकार परिषद घेतली आहे. पालघर निवडणूक लढवायची की नाही? या दुविधेत होतो... पण भाजपनं वाळीत टाकलेला वनगा परिवार भेटण्यासाठी आला आणि निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
काय म्हटलंय उद्धव ठाकरेंनी...
चार वर्षांतच भाजपनं बहुमत गमावलंय - उद्धव ठाकरे
पालघरमध्ये भाजपच्या विरोधात जास्त मतं - उद्धव ठाकरे
पालघर निवडणूक लढवायची की नाही? या दुविधेत होतो... पण भाजपनं वाळीत टाकलेला वनगा परिवार भेटण्यासाठी आला आणि निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला - उद्धव ठाकरे
वनगा परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी सेनेनं पालघर निवडणूक लढवली - उद्धव ठाकरे
भाजपला आता मित्रांची गरज नाही
योगींनी शिवरायांचा अपमान केला... भाजपच्या शिवभक्तीवर संशय येतोय - उद्धव ठाकरे
कैरानामध्ये जनतेनं योगींची मस्ती उतरवलीय - उद्धव ठाकरे
निवडणूक यंत्रणाही भ्रष्ट - उद्धव ठाकरे
मतदानाची वेळ वाढवून द्या, अशी गावितांनी मागणी केली होती
मतदानाच्या दिवशी पैसे वाटप करताना काही लोकांना पकडलं गेलं... त्यांच्याविरोधात रितसर तक्रार दाखल करण्यात आली नाही... आज भाजपच्या विजयानंतर तीच लोकं विजयी उमेदवारासोबत नाचत होती - उद्धव ठाकरे
लाखभर मतं कशी वाढली त्याचे पुरावे द्या - उद्धव ठाकरे
लोकशाही धोक्यात आहे असं म्हणण्यापेक्षा आता लोकशाहीच संपलीय की काय? असा प्रश्न विचारावा लागेल - उद्धव ठाकरे