सगळ्यात जास्त प्रेम कोणावर? उदयनराजेंनी दिलं हे उत्तर
झी २४ तासच्या `मुक्त चर्चा` कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या नेहमीच्याच शैलीत दिलखुलास उत्तरं दिली.
मुंबई : झी २४ तासच्या 'मुक्त चर्चा' कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या नेहमीच्याच शैलीत दिलखुलास उत्तरं दिली. 'माझी हवा कायम असते, कालही होती, आजही आहे आणि उद्यापण असेल!. पण हवा कशी तयार करतो हे सांगितलं तर माझी हवा निघून जाईल, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
'माझं आणि राष्ट्रवादीचं नातं प्रेमाचं आहे. माझं आणि राष्ट्रावादी काँग्रेसचं प्रेम हे न तुटणारं अतुट प्रेम आहे. माझं सगळ्यात जास्त प्रेम शरद पवार यांच्यावर आहे. शेतीविषयी त्यांचं असणारं ज्ञान आणि त्यांच्याएवढा अनुभव, त्यांची दूरदृष्टी, तसंच राज्यातल्या प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातली असणारी माहिती, असा दुसरा माणूस आज नाही. अशा माणसाच्या हातात देशाची धुरा दिली, तर देश प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करेल.', असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला.
'राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेता कोणीही नाही. आम्ही सगळे मित्र आहोत. वडिलकीच्या नात्याने शरद पवार यांचं स्थान निश्चित वेगळं आहे. पण बाकी सगळे मित्रमंडळी आहोत. अजित पवार माझे घनिष्ठ मित्र आहेत, पण याचं कारण सांगणार नाही, अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली.
मुक्त चर्चा | डॅशिंग उदयनराजे भोसले यांची बेधडक मुलाखत