मुंबई : झी २४ तासच्या 'मुक्त चर्चा' कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी स्वत:चा बायोपिक किंवा आत्मचरित्र आलं तर... या प्रश्नावर दिलखुलास उत्तर दिलं. 'हॅरी पॉटर काल्पनिक असून त्याने एवढे पैसे कमावले. माझं आत्मचरित्र ज्यावेळी लिहायला काढीन ते फूल मालटा असेल. त्यामुळे माझ्याशी नीट वागा आणि नीट राहा. माझ्या आत्मचरित्रामध्ये सगळं असेल. होल ऍण्ड सोल!' तसंच बायोपिक काढायचा असेल, तर मलाच पुन्हा जन्म घ्यावा लागेल, अशी फटकेबाजी उदयनराजेंनी झी २४ तासच्या 'मुक्त चर्चा' कार्यक्रमात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


उदयनराजे भोसले यांचा फिल्मी अंदाजही बघायला मिळाला. या कार्यक्रमात उदयनराजेंनी आपल्या मनातलं गाणंही म्हणून दाखवलं. 'तुमसे मिल कर न जाने क्यूं' हे गाणं उदयनराजे भोसले यांनी गायलं. तसंच हे गाणं मी जनतेसाठी म्हणत असल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत.