वसई : मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसईतला रिसॉर्ट व्यवसाय कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे याचा फटका इथल्या पर्यटनासह रिसॉर्ट व्यावसायिकांना बसत आहे. इतर वेळी विकेण्ड तसंच अन्य दिवशी गजबजलेल्या रिसॉर्ट बंद असल्याने रिसॉर्टच्या कामगार आणि मालकांवर बेकारीचं संकट ओढवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत हॉटेल्स मॉल्स सुरु झाले आहेत. मात्र रिसॉर्ट व्यवसाय सुरु करण्यास अद्याप परवानगी मिळाली नसल्याने, रिसॉर्ट व्यावसायिककांच्या चिंतेत वाढ झाली आहे.


वसईच्या समुद्रकिनाऱ्यावर छोटे-मोठे असे दीडशे ते दोनशे  रिसॉर्ट आहेत. भूमिपुत्र असलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून रिसॉर्ट व्यवसाय सुरु केले आहेत. मात्र नेहमी डिजेचा ठणठणाट करणारे रिसॉर्ट ओस असले, तरी बँकेचं कर्ज, भरमसाठ लाईट बिल आणि कामगारांचा पगार अशा अनेक समस्यांमुळे रिसॉर्ट व्यवसायाला घरघर लागली आहे. 


राज्यात सर्व व्यवहारांना शिथिलता जरी दिली असली तरी रिसॉर्टबाबत कोणत्याही सूचना प्रशासनाकडून अद्याप दिलेल्या नसल्याने, अजून किती महिने बेकारीचे काढायचे असा सवाल उपस्थित केला जात आहे.