केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार मुंबई दौऱ्यावर, सार्वजनिक गणपतींचं घेणार दर्शन
देशाचे गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत येणार असून विविध गणपतींचं दर्शन घेणार आहेत.
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Central Home Minister Amit Shah) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. 5 सप्टेंबरला ते मुंबईत दाखल होणार आहेत. अमित शाह हे लालबागच्या राजाचं (Laubaug Cha Raja) दर्शन घेतील. त्याचसोबत इतरही सार्वजनिक गणपतींचं दर्शन घेणार आहेत. उपमुख्यमंत्र्यांचं सागर निवासस्थान, मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थानी जावून देखील ते बाप्पांचं दर्शन घेणार आहेत. तसेच आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही ते भेट देणार आहेत.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर अमित शहा यांचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election दृष्टीकोनातून देखील या दौऱ्याकडे पाहिलं जात आहे. राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीचं सरकार आल्यानंतर अमित शहा पहिल्यांदाच राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
कोरोना (Corona) महामारीनंतर यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. यंदा कोरोनाचे कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे या वर्षी गणेशोत्सव मंडळांमध्ये ही उत्साहाचं वातावरण आहे. त्यात मुंबईत अमित शाह येणार असल्याने अनेक मंडळांचा उत्साह आणखी वाढला आहे.
अमित शहा हे सिध्दविनायकाचं (Siddhivinayak) देखील दर्शन घेणारेत. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.