Narayan Rane :... तर उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांना चपलेने मारतील - नारायण राणे
Narayan Rane : उद्धव आणि रश्मी ठाकरेंबाबत संजय राऊत खासगीत काय बोलतात ते मी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना सांगणार असल्यांच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.
Narayan Rane on Sanjay Raut : भाजप नेते आणि केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane ) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. (Political News ) संजय राऊत यांनी राणे यांच्यावर टीका केल्यानंतर आज राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत हे शिवसेना संपावयला निघाले आहेत. या संजय राऊतच्या मी काही गोष्टी उद्धव ठाकरे यांना सांगितल्या तर ते त्यांना चपलेने मारतील. मला रश्मी ठाकरे यांच्याबाबत काही गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. मी उद्धव ठाकरे यांना एक ना एक दिवस भेटून सांगणार आहे. त्यानंतर ते त्यांना चपलेने मारतील, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री राणे यांनी केले. (Maharashtra Political News )
भाजप आमदार राम कदम यांनी काशीसाठी मोफत ट्रेन सोडली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन या ट्रेनने तीन हजार प्रवाशी काशी यात्रेसाठी रवाना झाले आहेत. यावेळी राम कदम, मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. त्यानंतर राणे यांना काही प्रश्न पत्रकारांनी विचारले असताना त्यांनी संजय राऊत यांना इशारा दिला आहे. यावेळी नारायण राणे म्हणाले, मी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतलेली नाही. ही सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे. आता शिवसेनेत कोणही उरलेले नाहीत. याचा आनंद संजय राऊत यांना होत आहे. त्यानेचे शिवसेना संपवली. त्याने सामाजिक आर्थिक धार्मिक असे कोणतेच काम केलेले नाही. याने ज्यांचा खांद्यावर हात टाकला तो संपला. हा साप आहे, अशी टीका राणे यांनी राऊत यांच्यावर केली.
संजय राऊत राजकारणातला जोकर - राणे
उद्धव आणि रश्मी ठाकरेंबाबत संजय राऊत खासगीत काय बोलतात ते मी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना सांगणार असल्यांच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. राऊत काय बोलतात ते ऐकल्यावर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे त्यांना चपलेने मारतील, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलंय. आता त्यांना काहीही काम नाही. ते काहीही बोलत आहेत. त्यांच्याकडे सांगण्यासारखे विषय नाहीत. सकाळी उठल्यावर यांना बोलायची सवय लागली आहे. त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. संजय राऊत राजकारणातला जोकर अशी टीका राणे यांनी यावेळी केली.
इथं आता रावणाचा उल्लेख कशाला?
मला आज नाही 1990 पासून मला संरक्षण आहे. तो शिवसेने नव्हता. तो लोकप्रभेत लेख लिहत होता. मी आज ही सर्व सुरक्षा सोडून जायला तयार आहे, असे आव्हान देताना राणे म्हणाले आमचे सरकार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री शिंदे चांगले काम करत आहेत. सकाळी उठले की तुम्ही संजय राऊत दाखवता. पत्रकार म्हणून चांगल्या गोष्टी दाखवा. त्याचे काय योगदान आहे. आजच्या राजकारणाला हा जोकर आहे. शिव्या घालण्यापलीकडे तो काही करत नाही. राम कदम तीन हजार लोकांना काशी आणि सारनाथला घेऊन चालले आहेत. हे पवित्र कार्य आहे. काशी आणि सारनाथला आमचा राम घेवून चालला आहे. तिथे रामाचे कार्य चालू असताना रावणाचा उल्लेख कशाला, असा टोला राणे यांनी यावेळी हाणला.