मुंबई : Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणी पुन्हा  वाढण्याची शक्यता आहे. मुंबईतील बंगल्यावरून सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महारापालिकेने बजावलेली नोटीस मागे घेतल्याने दिलासा मिळला असे वाटत असताना प्रकरणाला नवे वळण लागले आहे.


राणे यांची अडचण वाढणार ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुहू येथील अधिश बंगला पूर्णपणे पाडण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई महारापालिकेने बजावलेली नोटीस मागे घेतल्याने दिलासा मिळला असे वाटत असताना प्रकरणाला नवे वळण लागले आहे. तक्रारीचे रूपांतर जनहीत याचिकेत झाले असून पुढील आठवड्यात सर्वोच्य न्यायलयात सुनावणी होणार आहे.


पीएनबी घोळ्यातील प्रमुख आरोपी निरव मोदी याच्या बंगल्याप्रमाणे नारायण राणे यांचा अधिश बंगला पाडावा अशी याचिकाकर्त्यांने मागणी केली आहे. माहिती अधिकारी प्रदीप भालेकल यांनी याचिका दाखल केली आहे.


दोन दिवसांपूर्वी राणे यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता. तर आता संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. सर्वोच्च न्यायालय नेमकी भूमिका काय घेते? राणे यांना परत एकदा दिलासा मिळणार का की त्यांच्या बंगल्यावर कारवाई होणार याकडे आता लक्ष लागले आहे.