मुंबई : ''स्टेप एन स्टेप सालसा डान्स अकॅडमी''ने एक अनोखा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता की, मासिक पाळीबाबत जागृकता. पण ही जागृकता अनोख्या पद्धतीने करण्यात आली. यासाठी 'स्टेप एन स्टेप सालसा डान्स अकॅडमी'ने सालसा डान्सच्या माध्यमातून यातं प्रबोधन केलं आहे. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा झाला. या दिवसाची आठवण ठेवून ही खास गोष्ट करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज 21 व्या शतकातही मासिक पाळीबद्दल असलेला समज - गैरसमज. जगभरात, मासिक पाळी ही एक दुर्बल, अगदी प्राणघातक आणि समस्या समजली जाते. गरिबीमुळे याबाबत चुकीची माहिती आणि अंधश्रद्धा पसरली जाते.  शिवाय, भारतातील चार मुलींपैकी एक मुलगी मासिक पाळीच्या दिवसात शाळेत एक दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काळ जात नाही. 


त्यामुळे सॅनिटरी नॅपकीन प्रत्येक मुलीला सहज उपलब्ध होणं हा त्यांचा अधिकार आहे. ही त्यांची गरज नसून प्रत्येक स्त्रीचा मुलभूत अधिकार आहे असं मानलं पाहिजे. आता आपल्या आजूबाजूला अनेक संस्था यासाठी कार्यरत आहेत. ज्यांच्याकडून मासिक पाळीच्या दिवसांत स्वच्छ आणि उपयोगी गोष्ट समजली पाहिजे. याच उद्देशाने स्टेप एन स्टेप सालसा डान्सने नेरळ येथील आसरा या संस्थेला 500 पॅड दिले आहेत. यासाठी संकेत मुकादम या स्टेप एन स्टेप सालसा डान्स अकॅडमीचे संस्थापक यांनी स्वाती बेडेकर यांच्याकडून हे सखी पॅड विकत घेतले आहे. 


याबाबत संकेत मुकादम यांनी असे सांगितले की, गावात, खेड्या पाड्यात अद्यापही स्त्रियांपर्यंत मासिक पाळीबाबत तेवढी जागृकता नाही. तसेच आजही गावाकडे पॅडबाबत माहिती नाही. तर या उद्देशाने स्त्रियांच्या आरोग्यासाठी थोडा हातभार लावण्याच्या दृष्टीकोनातून हा उपक्रम राबवण्यात आला.