अनारक्षित तिकीटांचे पैसे डेबिट-क्रेडिटने दिल्यास मिळणार सवलत
येत्या काही दिवसात रेल्वेच्या अनारक्षित तिकिटांचे पैसे डेबीट किंवा क्रेडीट कार्डनं दिल्यास त्यावर प्रवाशांना सवलत मिळणार आहे.
मुंबई : येत्या काही दिवसात रेल्वेच्या अनारक्षित तिकिटांचे पैसे डेबीट किंवा क्रेडीट कार्डनं दिल्यास त्यावर प्रवाशांना सवलत मिळणार आहे.
सध्या मासिक पासच्या ग्राहकांना कॅशलेस व्यवहारांसाठी अर्धा टक्का सवलत देण्यात येते.
हीच सवलत येत्या काळात इतर प्रवाशांनाही देण्याचा रेल्वेचा विचार आहे. त्याच प्रमाणे कॅशलेस व्यवहार करणाऱ्या प्रवशांच्या विमाही मोफत देण्याचा रेल्वेचा विचार आहे.