मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन अभिनेत्री आणि मुंबईतल्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. आपण विनोबा भावे, महात्मा गांधी,स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळकांचं हिंदुत्व मानतो. मात्र आत्ताचे हिंदुत्वाचे ठेकेदार यांचं तथाकथित हिंदुत्व आपल्याला मान्य नसल्याचं उर्मिला मातोंडकरनं म्हंटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात सध्या राजकारण खालच्या स्तरावर गेले आहे. पाच वर्षे झाली पण विकास झाला नाही. सुडाचं आणि द्वेषाचे राजकारण केले जात आहे. विकासावर प्रश्न विचारले तर तुम्ही देशद्रोही म्हणून घोषित केले जाते. प्रसिद्धी आणि आयटी सेलचा पैसा विकासासाठी खर्च केला असता तर बरे झाले असते. असं देखील उर्मिलाने म्हटलं आहे.


'मी राजकारणात येण्याचा निर्णय गेल्या साडेचार वर्षात घडलेल्या देशातील घटनेमुळे घेतला आहे. राजकारणातून समाजकारण करण्यासाठी उतरली आहे. सध्याच्या राजकारणात विकास होताना दिसत नाही. म्हणून मी उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे.'


'शिक्षणाला महत्व देणारे माझे कुटुंब आहे. सामाजिक बांधिलकी महत्त्वाची आहे. ती बांधिलकी मी जपत आली आहे. घरात आमचा कधीही वाढदिवस साजरा केला जायचा नाही. तो पैसा संस्थेला दिला जायचा. मी समाजकारणासाठी राजकारणात आली आहे. पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने आणि विकास झालेला दिसत नाही. लोकशाही टिकवण्यासाठी ७ स्टार आयुष्य सोडून मी राजकारणात उतरले आहे. माझी निष्ठा माझ्या देशावर म्हणून मला यश नक्की मिळेल.'


'मी मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न केले म्हणून ट्रोल केले जाते. मी मराठी आहे. गांधी आणि शिवाजी यांची शिकवण मला आहे. ७० वर्षात काय केलं हे विचारणारा भाजप रडीचा डाव खेळत आहे. लहान मुलांप्रमाणे वागत आहेत. नेहरूंचे कार्य तुमच्या समोर आहे. त्यांच्याबद्दल प्रश्न विचारणाऱ्यांनी स्वतःची कुवत वाढवावी.' असं देखील अर्मिलाने म्हटलं आहे.