मुंबई : मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आपल्या राजकारणाचा प्रवास शिवसेनेच्या दिशेने वळवण्याच्या मार्गावर आहेत. काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर सोमवारी उर्मिला शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोरदार रंगत आहेत. शिवाय शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थीत त्या पक्षप्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश करत त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उर्मिलांना उमेदवारी मिळाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना उर्मिला यांना विधान परिषदेत पाठवण्याच्या तयारीत आहेत. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी एका जागेसाठी शिवसेनेनं त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. महाआघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील ४-४ नावांची यादी राजपालांकडे दिली आहे. 


एकंदर पाहता उर्मिला शिवसेनेत प्रवेश करतील असे अंदाज सध्या लावण्यात येत आहेत. दरम्यान विधान परिषदेतील काही जागा अद्यापही रिक्त आहेत. राज्यपाल कोट्यामधील विधान परिषद जागांवर खेळ, कला, विज्ञान, शिक्षा, साहित्य, इत्यादी क्षेत्रातील विद्वान व्यक्तींची नियुक्ती करण्यात येणार आहे.