मुंबई : राज्यात सध्या उर्मिला मातोंडकर यांचं नाव चर्चेत आहे. राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिवसेनेने उर्मिला मातोंडकर यांना ऑफर दिल्याचं कळतं आहे. तसेच ही ऑफर उर्मिला मातोंडकर यांनी स्विकारल्याची देखील चर्चा आहे. पण यावरुन जुने शिवसैनिक मात्र नाराज आहेत. शिवसैनिकांमध्ये आता कुजबुज सुरु झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या राज्यात विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी कोणाला उमेदवारी मिळते याबाबत चर्चा आहे. गेल्या वर्षी काँग्रेसमधून निवडणूक लढवणाऱ्या उर्मिला मातोंडकर या शिवसेनेच्या कोट्यातून आमदार होणार असल्याच्या चर्चा रंगल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.


शिवसेनेत गेल्या अनेक वर्षांपासून काम करणारे कार्यकर्ते आहेत. पण त्यांना संधी मिळत नसून बाहेरुन आलेल्या लोकांना संधी मिळत असल्याने शिवसैनिक नाराज असल्याची चर्चा आहे.