मुंबई : उन्हाळ्यात आंब्यांचा सिझन असल्यामुळे आंब्यापासून बनलेला आमरसावर सर्वच जण ताव मारतात. परंतु बाजारात मिळणारा तयार आमरस घेताना जरा काळजी घ्या. कारण मुलुंडच्या राजा इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये विजय ट्रेडर्स या गोडाउनमध्ये अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून निकृष्ट दर्जाचा आमरस बनवणाऱ्यांवर कारवाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमरस तयार करणाऱ्या गाळ्यांमध्ये अस्वच्छा दिसून आली. याच जागेवर रासायनिक पदार्थ मिसळून आमरस तयार केला जात होता. अन्न व औषध प्रशासनाने रात्रीच्या वेळी या गोडाउनमध्ये छापा टाकून आमरसात मिसळण्यात येणारा रासायनिक पदार्थ आणि ३४२५ किलोचा आमरससह ८ लाख ८७ हजार असा मुद्देमाल जप्त केला. या आमरसाचे नमुने वैद्यकीय परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आमरस खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आला आहे.


जर प्रयोगशाळेतील अहवालानंतर खंबर बाबपुढे आली तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच गुन्हा सिद्ध झाल्यास न्यायालयीन कोठडीची तरतूद आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त शैलेश आढाव यांनी दिली.