प्रशांत अंकुशराव / मुंबई : आईस्क्रीम म्हणजे अनेकांचे अगदी  आवडीचा पदार्थ त्यात उन्हाळा सुरू झाला की अनेक  जण आईस्क्रीमच्या दुकानावर जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीमचा स्वाद घेतला जातो. मात्र आपण जे आइस्क्रीम खातो ते खरेच आईस्क्रीम आहे की आणखी काही आणि जे खातो ते आरोग्यासाठी अपायकारक आहे का उन्हाळा वाढताच आईस्क्रीमच्या दुकानावर गर्दी पाहायला मिळते. अनेक जण उष्मां वाढताच आईस्क्रीम किंवा शीतपेये ला प्राधान्य देतात. मात्र याचाच फायदा काही व्यवसायिक घेतात आणि आईस्क्रीमच्या नावावर फ्रोजन डेजर्ट देतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आईस्क्रीममध्ये दुधाच्या ऐवजी वनस्पती तेलाचा वापर केला जातो, अश्या प्रकारे दुधाच्या ऐवजी वनस्पती तेलाची मिश्रण केले जाते अश्या प्रकारची गुप्तमाहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळताच अन्न आणि औषध प्रशासनाने शिवडी येथील साईनाथ इंडस्ट्री भारत इंडस्ट्रियल कंपन्यांवर छापे टाकून स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला आईस्क्रीम तयार करताना वनस्पती तेलाचा वापर करण्यात येत होता. त्यानुसार एफडीएने 27 हजार 586 रुपयांचा आईस्क्रीम साठा जप्त करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी नमुना प्रयोग शाळेत पाठवण्यात आले असून तपास सुरू आहे, अशी माहिती एफडीएचे सहाय्यक आयुक्त बी. द. मुळे यांनी दिली. 


आईस्क्रीम या सदरात फक्त दुग्ध जन्यपदार्थ वापरावे लागते आणि त्याप्रमाणे व्यवसायिकाने आपल्या प्रोडक्ट वर स्पष्ट पणे दर्शनी भागावर लिहावे लागते तर , ज्या शितवस्तुत दुग्धजन्य पदार्थ वापरले जात नाही ते पदार्थ फ्रोजन डेजर्ट प्रकारात मोडतात. दोन्ही ही पदार्थ आरोग्यासाठी अपायकारक नसले तरी दुग्धजन्य पदार्थ किंवा वनस्पती तेल हे यामुळे एखाद्याला अॅलर्जी असू शकते त्यामुळे आपण काय खातो याची माहिती होणे आवश्यक आहे. तर आईस्क्रीमच्या नावाने ग्राहकांची देखील आर्थिक फसवणूक होत असते उन्हाळा सुरू झाला की आईस्क्रीम खातो आणि त्याच आईस्क्रीममुळे आपले आरोग्य बिघडते असे कित्येक वेळा घडते, कित्येक वेळा तर उघड्यावरील आईस्क्रीम तर खाऊन आरोग्य बिघडते म्हणूनच आपण काय खातो याची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. मग ते आईस्क्रीम खातो की आणखी काय याची माहिती आपल्याला होणे गरजेचे आहे.