Water supply in Mumbai and Thane : मुंबई आणि ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. मुंबईसह ठाण्यात आजपासून पुढचा महिनाभर 15 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. ठाण्यात बोअरिंगच्या खोदकामामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणा-या जलबोगद्याला गळती लागलीय. दुरुस्तीचं या कामाला आजपासून सुरुवात होणारेय. त्यामुळं मुंबई आणि ठाण्यात 15 टक्के पाणीकपात केली जाणारेय. या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवा आणि काटकसरीने पाणी वापरा, असं आवाहन मुंबई महापालिकेनं नागरिकांना केले आहे.


30 दिवस पाणीकपातीचे संकट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमध्ये आज  31 मार्चपासून 15 टक्के पाणीकपात सुरु होणार असून ती 30 दिवस चालणार आहे. भांडुप कॉम्प्लेक्स येथील जलशुद्धीकरणाचा पाणी वाहून नेणारा बोगदा खराब झाला झालाय. मुंबईचा 65 टक्क्यां पेक्षा जास्त पाणीपुरवठा उपनगरांसह जलशुद्धीकरण सुविधेतून होतो. 5,500 मिमी व्यासाचा, 15 किमी लांबीचा बोगदा भांडुप संकुलात पाणी वाहून नेण्यासाठी वापरला जातो. बोअरवेलच्या खोदकामामुळे ठाण्यात एक बोगदा खराब झाला आहे. येथे मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरु आहे. याची दुरुस्ती तातडीने हाती घेण्यात आली आहे. बोगदा दुरुस्त करण्यासाठी पाणीपुरवठा बंद करावा लागला आहे. त्यामुळे ही पाणीकपात होणार आहे.


ठाण्यातही आजपासून पाणीपुरवठ्यात कपात


तर ठाण्यात मंगळवारी एका बोअरवेलच्या खोदकामामुळे पाणी वाहून नेणाऱ्या बोगद्याचे नुकसान झाले. दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी बीएमसीने 31 मार्चपासून मुंबईत 15 टक्के पाणीकपात एका महिन्यासाठी बंधनकारक केली आहे. यासाठी किमान 30 दिवस लागतील. यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.


मुलुंड जकात नाक्या येथील जलवाहिनी फुटली आहे. याचा परिणाम हा मुंबई शहर आणि त्याच्या पूर्व उपनगरावर होणार आहे. तसेच ठाण्यातही पाणी कपात करण्यात येणार आहे. गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मुंबईचा सुमारे 65 टक्के पाणीपुरवठा भांडुप येथील जलशुद्धीकरणातून होतो. त्यामुळे दुरुस्ती काम आणि  ट्रान्समिशन सिस्टिमचे स्विच ओव्हर आणि दुरुस्तीदरम्यान मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. यासाठी, आम्ही दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत मुंबई आणि ठाण्यासाठी ही पाणीकपात लागू करण्यात येणार आहे.