Valentine Day 2023 : दे दणादण! व्हॅलेंटाइन डेच्याच दिवशी मायलेकींनी रोड रोमियोला चोपलं; Video सोशल मीडियावर Viral
Valentine Day 2023 Viral Video : व्हॅलेंटाइन डे रस्त्यावर अनेक रोड रोमियो रस्त्यावर फिरत असतात. त्यामुळे मुलींना घराबाहेर पडणं देखील मुश्लिक असतं. अशातच एका रोमियोगिरी करणाला तरुणाला चांगलाच प्रसाद मिळाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Valentine Day 2023 Viral Video : आज जगभरात प्रेमाचा उत्सव (Valentine Day 2023) साजरा करण्यात येतो आहे. आज व्हॅलेंटाइन डे असल्याने आपल्या प्रिय व्यक्तीला प्रेमाच्या भावना व्यक्त करण्याचा दिवस...समोरच्या व्यक्तीकडून होकार आला तर ठिक आहे...नाही तर काही तरुण एकतर्फी प्रेमातून गुन्हेगारीकडे वळतात. तर आजच्या दिवशी मुलींना घराबाहेर पडणे कठीण असतं. कारण काही रोड रोमियो रस्त्यात मुलांची छेड काढतात. गेल्या काही वर्षांपासून अशा रोड रोमियोंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पालकांकडून अशा तरुणांना भीती बसावी म्हणून ठोस पाऊल उचलण्याची मागणी जोर धरत आहे. अशातच एक व्हिडीओ (Trending video) सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतो आहे. ज्या रोमियोगिरी करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. (girl harassment news)
दे दणादण!
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका तरुणाला मायलेकीने चांगलच चोपलं आहे. या तरुणाने भररस्त्यात तरुणीची छेड काढली होती. त्यानंतर मायलेकीने बेदम चोपलं आहे. आजूबाजूच्या लोकांनीही त्या तरुणाला समज दिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Valentine Day 2023 Mumbai Crime daughter mother beat Road Romeo video viral on Social media )
कुठे घडली घटना?
ही घटना मुंबईतील (Mumbai News) नालासोपाऱ्यातील (Nalasopara Crime) पूर्व आचोळे रोड डॉन लेन परिसरातील आहे. या घटनेची पोलिसांकडे कुठलीही नोंद नाही. शिवाय या मायलेकी कुठल्या परिसरात राहतात याबद्दलही माहिती नाही. मात्र या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मुलींची छेड काढण्याचे प्रमाण वाढलं असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.