वसई :  वसईहून सुटणारी महिला लोकल रेल्वे प्रशासनाने रद्द केली आहे. सकळी  वसईहून सुटणारी महिलासपेशल लोकल रद्द करून ती आता विरार हन सुटणार आहे. या मुळे  महिला वर्ग संतप्त झाल्या आहेत. तर या विरोधात   महिला आता  आंदोलनाचा पवित्रा घेणार आहेत. 'यंदाच्या भाऊबिजेला आमची लोकाल परत द्या', अशी मागणी संतप्त महिलांनी केली आहे.वसईच्या एक नंबर प्लाटफॉर्मवरून दररोज सकळी ९ वाजून ५६ मिनिटांनी एक महिला स्पेशल लोकल सुटते. १ नोव्हेबर पासून वसईहून सुटणारी  लोकल आता विरार स्थानकातून सुटते.


इतर लोकलवर ताण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळची महिला लोकल बंद झाल्यामुळे हजारो महिला प्रवाशांचा ताण इतर लोकलवर आलायं. पश्चिम रेल्वेने  नुकतेच नवीन वेळापत्रक जाहीर करून  अनेक  फेऱ्या वाढवल्याचे जाहीर केलं.  'यंदाच्या भाऊबीजेला रेल्वेने आमची झुक झुक गाडी आम्हाला आहे तशी परत करा'अशी केवीलवाणी मागणी या महिला करत आहे.


आंदोलन करणार 


ही 'महिला स्पेशल लोकल' केवळ वसईचं नव्हे तर नायगाव,भाईंदर, मिरारोड ते थेट बोरीवली पर्यंतच्या महिलांनासाठी फायद्याची होती. विरारहून लोकल भरून आल्यावर वसई ते बोरीवली दरम्यानच्या महिलांना रेल्वेत चढायला  देखील मिळत नाही. या विरोधात आता महिला शक्ती आता एकत्र आली आहे.


महिला लोकल पुन्हा सुरु न झाल्यास 'मी वसईकर'संघटनेतर्फे मोठे आंदोलन करणार असल्याचे 'मी वसईकर' अभियानाचे मुख्य समन्वयक मिलिंद खानोलकर यांनी सांगितले.