मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान, सामान्यांच्या खिशाला झळ
घाऊक बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर ३० टक्क्यांनी वाढलेत.
मुंबई: गेल्या काही दिवसांत राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता भाजीपाला उत्पादनाला बसला आहे. पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाले असून त्यामुळे बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. परिणामी घाऊक बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर ३० टक्क्यांनी वाढलेत.
तर किरकोळ बाजारात भाजीपाल्याच्या किंमती ८० ते १२० रुपये किलोच्या घरात पोहोचल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून गाड्यांची आवक कमी झाली आहे. नवी मुंबई मार्केटमध्ये एरवी भाजीपाल्याच्या 650 गाड्या दाखल होतात. मात्र, आता हेच प्रमाण ४५० ते ५०० पर्यंत खाली आहे.